24.5 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता किमतीपेक्षा अधिक पैसे घेणाऱ्या किराणा दुकानदारावर दंडात्मक कारवाई

किमतीपेक्षा अधिक पैसे घेणाऱ्या किराणा दुकानदारावर दंडात्मक कारवाई

0
699

अर्जुनी मोरगाव,दि.17ः तालुक्यातील नवेगावबांध येथील किराणा दुकानदार रोहीत येरणे यांनी छापील किमतीपेक्षा अधिक दराने मीठाचे पॅकेट विक्री करीत असल्याची तक्रार ग्राहकाकंडून तहसिलदारांना मिळाल्याने संबधित दुकानदारावर चौकशीअंती दंडात्मक कारवाई करण्यात आली.छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्याप्रकरणी तहसिलदार यांच्या पथकातील अधिकारी नायब तहसीलदार गेडाम, निरीक्षण अधिकारी विनोद काळे यांनी दुकानदारावर एक हजाराचा दंड आकारला.तसेच पुन्हा असे केल्यास जीवनावश्यक कायदा अधिनियम 1955 अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी सूचना दिली.दरम्यान ग्राहकांनी छापील किमतीपेक्षा अधिक दराने कुणी विक्री करीत असल्यास तत्काळ त्याची माहिती महसुल विभागाला द्यावे असे आवाहन अर्जुनी-मोर उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे व अर्जुनी-मोर तहसीलदार विनोद मेश्राम यांनी केले आहे.