
गोंदिया,दि.17ः कोव्हीड 19 मुळे गेल्या काही दिवसापासून न्यायालयीन कामकाज बंद पडल्याने जिल्ह्यातील वकिलांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.त्यामुळे सरकारने 1 ते 5 वर्ष वकिली केलेल्या सर्व वकिलांना 20 हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी,या आशयाचे निवेदन गोंदिया जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने उपविभागीय अधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एड.टी.बी.कटरे, एड.रजत ठाकुर,एड.बिस्वास,एड.अभिलाष येडे,एड.विश्वनाथ रहांगडाले उपस्थित होते.




