गोंदिया,दि.17ः हवामान विभागाने तालुकानिहाय व महिना निहाय सरासरी पर्जन्यमान निश्चित केले आहे यास शासनाने मान्यता दिली असून सदर पर्जन्यमान निश्चित केल्याने दुष्काळ,पाणी टंचाई व इतर परिस्थिती करिता उपयोगी पडणार आहे.
मिळालेल्या अहवालानुसार गोंदिया जिल्ह्यात अपेक्षित पावसाची वार्षिक सरासरी १२९८.५० मी.मी.इतकी अपेक्षित आहे यात आमगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
दरवर्षी मान्सून कालावधीत हवामान खात्याकडून शासनाकडून तयार करण्यात येणारा पर्जन्यमान अहवाल तसेच विभागीय आयुक्तांकडे तयार करण्यात येणारे पर्जन्यमान अहवाल हे सरासरी पर्जन्यमानाच्या आधारित तयार केले जाते,यासाठी आता मात्र जिल्हानिहाय व तालुकानिहाय पर्जन्यमानाची सरासरी आकडेवारी विचारात घेतली जात आहे.
तर घेतली जाणारी आकडेवारी २००६ मध्ये निश्चित केली होती गेल्या १४ वर्षात राज्याच्या पर्जन्यमानाच्या सरासरी आकडेवारी आता बदल करण्यात आलेला आहे
त्यामुळे पुणे येथील भारतीय हवामान विभागाने सन १९६१ ते २०१० या कालावधीतील तालुकानिहाय पर्जन्यमान विचारात घेऊन राज्यातील प्रत्येक तालुकानिहाय व महिना निहाय सरासरी पर्जन्यमान याची आकडेवारी तयार केली आहे.
यापुढे राज्यातील तालुका निहाय व महिना निहाय सरासरी पर्जन्यमान याची आकडेवारी आधारभूत करण्यात यावी असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे यासाठी १२ मे २०२० रोजी शासन निर्णय पारित करण्यात आला आहे.
आगामी कालावधीत पर्जन्य विषयक अहवाल तयार करण्यासाठी नवीन आकडेवारी वापरण्यात यावी तसेच दुष्काळाची मूल्यांकन करण्यासाठी देखील नवीन सरासरी पर्जन्यमानाच्या आकडेवारीचा वापर करावा असे निर्देश शासनाने संबंधित विभागांना दिले आहेत.
तालुकानिहाय सरासरी अपेक्षित पर्जन्यमान
गोंदिया -१३६६.७८,आमगाव- १५७३.३०,तिरोडा- १२८९.६३,गोरेगाव-११३३.८०,सालेकसा-१२५७.३०,देवरी- १४०१.५२
अर्जुनी मोरगाव- १४८०.७०,सडक/अर्जुनी -१४४३.९० मी.मी.





