25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ पुरवठा एक ट्रक तांदळाचा…मात्र साडेसात क्विंटल तांदूळ निकृष्ट

पुरवठा एक ट्रक तांदळाचा…मात्र साडेसात क्विंटल तांदूळ निकृष्ट

पुरवठादारावर कारवाई करण्याची शिधापत्रिका धारकांची मागणी

0
913

गोंदिया,दि.18 : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराला गोंदिया खमारी येथील माया राईस मिलर्सकडून तांदळाचा पुरवठा करण्यात आला होता.  पुरवठा करण्यात आलेला तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार शनिवार(दि.16) पुरवठा विभागाकडे करण्यात आली. त्याची पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (दि. 17)  तपासणी केली असता पुरवठा केलेल्या तांदळापैकी साडेसात क्विंटल तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याची बाब चौकशीत स्पष्ट झाली. उल्लेखनीय म्हणजे तांदूळ ट्रकभरून पाठविण्यात येते. मग केवळ साडेसात क्विंटलच तांदूळ निकृष्ट कसा असाही सवाल उपस्थित करुन चौकशी अधिकार्यावरच संशय नागरिकांनी संशय निर्माण केला आहे. या प्रकरणात निष्पक्ष चौकशीवर शंका निर्माण झाली असून प्रकरण दडपण्यासाठी मंत्रालय पातळीवरुन हालचाली सुरु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.यामध्ये संबधित राईस मिल मालकासह गुणवत्ता तपासणीवर कुठलीच कारवाई होऊ नये तसेच इतर तांदुळ परत घेऊन चांगल्या गुणवत्तेचा तांदुळ उपलब्ध करुन देण्याची धडपड सुरु असल्याचे वृत्त हाती आले आहे.

कोरोना वायरस च्या प्रादुर्भावामुळे गरजूंना दिलासा म्हणून स्वस्त धान्य दुकानातून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वितरणाची ची योजना मागील महिन्यापासून राबविण्यात येत आहे. त्यानुसार 16 मे रोजी नवेगावबांध येथील काही लाभार्थी यांनी स्वस्त धान्य दुकानात मोफत धान्य उचलण्यासाठी गेले असता त्यांना खूप जुने खंडा मिश्रित व पाखड तसेच  अळ्या असलेले तांदूळ वाटप करण्यात आले. या तांदळाचा पुरवठा खमारी येथील माया राईस मिलर्स कडून करण्यात आला होता. नवेगावबांध येथील लाभार्थ्यांनी ही हकीगत  सरपंच अनिरुद्ध शहारे यांना सांगितली. यावर त्यांनी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले तसेच तहसीलदार विनोद मेश्राम यांना दूरध्वनीवरून याची माहिती दिली. तालुका पुरवठा निरीक्षक विनोद काळे व नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम यांनी गोदाम कीपर मोहर्ले यांना चौकशीकरिता पाठविले.  शनिवारी सायंकाळी उशीर झाल्यामुळे चौकशी पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे रविवारी सकाळी याच कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. त्यात एकूण उचल केलेल्या तांदळा पैकी साडेसात क्विंटल तांदूळ निकृष्ट दर्जाच्या आढळले. यामुळे स्वस्त धान्य दुकानांना राईस मिलर्स कडून निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा होत असल्याच्या चर्चेला अखेर दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभाग याप्रकरणी नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भरडाई नंतर त्या तांदळाची गुणवत्ता तपासताना हा प्रकार कसा लक्षात आला नाही. राईस मिलर्सशी संगणमत करून गुणवत्ता नियंत्रकाने निकृष्ट तांदूळ स्विकारला तर नाही, असा संशय बळावला आहे. स्वस्त धान्य दुकानांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा करणाऱ्या संबंधित माया राईस मिलच्या मालकावर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करावी तसेच या प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचीही ही सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नवेगावबांधवासियांनी केली आहे.

तर ३४० कलमान्वये गुन्हा दाखल

स्वस्त धान्य दुकानातून विक्रीत होत असलेल्या तांदळाची गुणवत्ता असायला हवी असा नियम आहे. शिवाय अर्जुनी मोरगाव तालुक्यात अनेक राईस मिल असून सुद्धा गोंदिया येथील राईस मिल मधून गुणवत्ता नसलेला तांदूळ पुरवठा का करण्यात आला. सीएमआर अंतर्गत निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा करता येत नाही. परंतु राजकीय दबावा चा वापर करून नेहमीच असे केले जात असल्याची चर्चा आहे.  विशेष म्हणजे गुणवत्ता तपासणी नंतरच तांदळाचा स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो. या तांदळाची तपासणी देखील गुणवत्ता तपासणीचे प्रशिक्षण नसलेल्या निरीक्षकाकडून करण्यात आल्याची माहिती आहे. चिरीमिरी घेवून निकृष्ट तांदूळ स्विकारणाऱ्या गुणवत्ता नियंत्रकाची देखील या  प्रकरणात मोठी भूमिका आहे. अन्नसुरक्षा कायद्यानुसार अशा प्रकारात गुणवत्ता नियंत्रक आणि पुरवठादार दोषी आढळल्यास त्यांच्यावर कलम ३४० अंतर्गत कारवाईची देखील तरतूद आहे.

गुणवत्ता तपासणीवर प्रश्न चिन्ह
स्वस्त धान्य दुकानातून वितरित होत असलेल्या तांदळाची गुणवत्ता असायला हवी असा नियम आहे. शिवाय अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अनेक राईस मिल असून सुद्धा गोंदिया येथील राईस मिल मधून गुणवत्ता नसलुेला तांदुळ का पुरवठा करण्यात आला. सीएमआर अंतर्गत निकृष्ठ दर्जाचा तांदुळ पुरवठा करता येत नाही. परंतु राजकीय दबाव व राईसमिलर्स लॉबीचा वापर करुन नेहमीच असे केले जात असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे गुणवत्ता तपासणीनंतरच तांदळाचा स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो. मग यानंतरही निकृष्ठ दर्जाच्या तांदळाचा पुरवठा केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.याप्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकारी यांची भूमिकाही संशयास्पद आहे.गेल्या काही महिन्यापुर्वीच मिलिंगच्यावेळी परजिल्ह्यातून तपासणी अधिकारी आणून स्थानिक जिल्ह्यातील तपासणी अधिकारी यांना डावलले होते,तेव्हाच यावर शंका व्यक्त करण्यात आली होती,यासंदर्भातील वृत्त बेरार टाईम्सने प्रकाशितही केले होते.
पुरवठादार माया राईस मिलवर गुन्हा दाखल करा
स्वस्त धान्य दुकानांना निकृष्ठ दर्जाचा तांदुळ पुरवठा करणाèया संबंधित राईस मिल मालकावर त्वरित गुन्हा दाखल करुन अटक करावी. तसेच या प्रकरणाला खतपाणी घालणाèया संबंधित विभागाच्या अधिकाèयांचीही चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी मारोती हटवार व लाभार्थ्यासह सामाजिक सदस्यांनी केली आहे.

निकूष्ठ दर्जाचे आढळलेले साडेसात क्विंटल तांदूळ गोदामात परत जमा करण्यात आले. त्याऐवजी रेशन दुकानदाराला तेवढेच धान्य पुरवठा करण्यात आले. सोमवारपासून नियमित धान्य वितरण करण्याची सुचना दुकानदाराला दिली आहे. सदर चौकशी अहवाल जिल्ह पुरवठा अधिकारी गोंदिया यांना सादर करण्यात येणार असून गोंदिया तालुक्यातील खमारी येथील माया राईस मिल ने हा तांदुळ पुरवठा केलेला आहे.परंतु संबधितावर कारवाईचे अधिकार हे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे असल्याचे अर्जुनी मोरगाव तहसिल कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक अधिकारी विनोद काळे यांनी सांगितले. दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्याशी यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आले,मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांची भूमिका कळू शकली नाही.

अन्नपुरवठा मंत्र्याच्या गोंदिया-भंडारा दौर्यानंतरच झाले होते मिलिंगचे टेंडर

गेल्या दोन महिन्यापुर्वी राज्याचे अन्नपुरवठा मंत्री गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या भेटीवर आले असता राईस मिलर्स असो.च्या काही सदस्यांनी त्यांची भेट घेतली होती.त्या भेटीनंतरच शासकीय धान खरेदी केंद्रावरील धान उचलण्याची प्रकिया सुरु होऊन भरडाईला सुरवात झालेली होती,हे विशेष.

बोरगावचे दुकान रद्द, गोंदेखारीचे अधिकार काढले

गोरेगाव तालुक्यातील बोरगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार अशोक मेश्राम यांनी लाभार्थ्यांना पावती न देता कमी धान्य दिल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची शहानिशा करून दोषी आढळल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दुकानदाराकडील परवाना रद्द केला. त्याचप्रकारे गोंदेखारी येथील दुकानदार श्रीराम ठाकरे यांच्यावर देखील आरोप झाले होते. तालुका पुरवठा निरीक्षक श्री मिर्जा यांनी चौकशी केली असता आरोपांत तथ्य आढळल्याने गोंदेखारी येथील दुकानाचे अधिकार काढण्यात आले.