साकोली/भंडारा,दि.18 : आधी ग्रीन व नंतर ऑरेंज झोनमध्ये आल्यानंतर एकमेव पॉझीटिव्ह असलेली करोनाबाधीत महिला रुग्ण तपासणीनंतर पुन्हा निगेटिव्ह घोषित करण्यात आली. परंतु पुण्यावरुन भंडारा येथे आलेल्या दोघांचे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी शनिवारी दोघांचेही अहवाल पॉझीटिव्ह आल्याने रुग्णसंख्या 3 झाली होती.त्यानंतर आज सोमवारला पुन्हा सकाळच्या सुमारास 15 मे रोजी पाठवण्यात आलेला एक नमुना पाॅझिटिव्ह आल्याने भंडारा जिल्ह्यातील रुग्ण संख्या 4 वर पोचली.त्यानंतर परत सांयकाळच्या सुमारास पुणे येथून साकोली तालुक्यात आलेले चार व्यक्तीचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आढळल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील रुग्ण संख्या 8 वर पोचली आहे.साकोली येथील हे चारही जण संस्थात्मक विलगीकरणात साकोली येथे ठेवण्यात आले होते. तर सकाळी पाॅझिटिव्ह अहवाल आलेला १९ वर्षीय तरुण नाशिक येथून कोणतीही परवानगी न घेता ट्रकने आलेला होता.तो लाखनी येथील रहिवासी असून त्याला १४ मे रोजी भंडारा सीमेवरील चेकपोस्ट येथे पोहचल्यानंतर राजेदहेगाव येथील वसतिगृहात क्वारंटाइन करण्यात आले होते.१५ मे रोजी त्याच्या घशातील नमुना पाठविण्यात आले होता,तो आज १८ मे रोजी करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याचे जिल्हाधिकारी प्रदीपचंद्रन यांनी सांगितले. या सर्व नव्या रुग्णामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 8 वर गेली आहे. दरम्यान साकोली तालुकामुख्यालयातील सर्वच बाजारपेठ बंद करुन लोकामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भंडारात प्रवेश केला तेव्हाच त्यांना इन्स्टीट्युशन क्वारंटाईन करण्यात आले होते. याच दरम्यान या दोघांचे घशांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. शनिवारी दोघांचे नमुने पॉझीटिव्ह आले आहेत.मात्र सदर दोन्ही रुग्ण पुणे येथून आलेल्या व भंडारा येथे राहत असलेल्या भागाची माहिती रविवारी जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली होती.त्यातच आज पुन्हा सकाळी 1 रुग्ण त्यानंतर सायकांळी साकोली येथील विलगीकरणात असलेले 4 जण पाॅझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात 8 रुग्णसंख्या झाल्याने जिल्हा आॅरेंज झोनमध्ये राहणार हे निश्चित झाले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत मुंबई, पुणे व इतर राज्यातून ३२ हजार ०६५ व्यक्ती आले आहेत.





