25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home Top News झारखंडला मजुरांना नेणाऱ्या एसटीचा यवतमाळ येथे अपघात; ४ जण जागीच ठार

झारखंडला मजुरांना नेणाऱ्या एसटीचा यवतमाळ येथे अपघात; ४ जण जागीच ठार

0
302

यवतमाळ,दि.19ः – औरंगाबादमध्ये झालेल्या मजुरांच्या रेल्वे अपघाताची दुर्घटना ताजी असताना पुन्हा एकदा यवतमाळमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १५ मजूर जखमी आहे.आरणी तालुक्यात पहाटे साडेतीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या डंपरला एसटी बस धडकली, कोळवण गावाजवळ ही घटना घडली. त्यामुळे एसटीचा पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही एसटी सोलापूर येथून मजुरांना घेऊन झारखंडच्या दिशेने जात होती पण दुर्दैवाने वाटेतच हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.