35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता सृजन्नक्काच्या हत्येच्या निषेधार्थ माओवाद्यांनी लावले बॅनर पोस्टर

सृजन्नक्काच्या हत्येच्या निषेधार्थ माओवाद्यांनी लावले बॅनर पोस्टर

0
215

blank

गोंदिया,दि.२०ः गडचिरोली जिल्ह्यात २ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी येथील जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत जहाल नक्षली सृजनक्का सि. ६० जवानाकडून ठार झाली होती. तिच्या मृत्यूच्या निषेधार्थ नक्षल्यांनी आज २० मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले होते.त्या अनुषगांने गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त परिसर असलेल्या केशोरी पोलीस ठाणेंतर्गतच्या अतिसंवदेनशिल राजोली,भरनोली,सायगाव तुकुम,बोरटोला व तिरखुरी मार्गावर नक्षल्यांनी बॅनर,पोस्टर लावल्याचे आज(दि.२०)दिसून आले. त्यांनी बॅनर बांधून रस्ता अडविला. बॅनरवर सृजनक्काला श्रद्धांजली वाहणारा मजकूर लिहून २२ मेपर्यंत जिल्हा बंद पाळण्याचे फर्मान सोडले.करोना १९ च्या पाश्र्वभूमीवर सर्वत्र जनसामान्य वर्ग अडचणीत सापडला असून त्यासाठी लाँकडाऊनही घोषित करण्यात आले.या महामारीपासून जनसामान्यांना जागृत करीत असतानाच आमच्या नेत्या सृजन्नकावर पोलिसांनी हल्ला करुन फासीवादी qहदू ब्राम्हणवादी विचारांचे दर्शन घडविल्याचे उल्लेख केले आहे. बॅनर उत्तरगडचिरोली डिव्हीजनल दलमच्यावतीने लावण्यात आले आहे.या बॅनर व पत्रकामध्ये सामा्रज्यवाद,पुंजीवाद,दलाल नोकरशाहीसह केंद्र व राज्यसरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आलेला आहे.गोंदिया जिल्ह्यात मात्र नक्षल्यांच्या या बंदला नक्षलग्रस्त अतिसवेंदनशिल भागातही कुठेच प्रतिसाद मिळाले नसल्याचे वृत्त आहे.

blank