25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home गुन्हेवार्ता बनावट ई पास तयार करणाा-या व करून देेेेेणा-या इसमांवर गुन्हा दाखल

बनावट ई पास तयार करणाा-या व करून देेेेेणा-या इसमांवर गुन्हा दाखल

0
275

गडचिरोली,दि.21ः- करोना साथरोग विषाणूच्या प्रादुर्भावाच्या  पार्श्वभुमीवर साथरोग अधिनियम १८९७ चे तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाची अंमलबजावणी निमित्य नाकाबंदीवर अंमलबजावणी करीत असताना एका मोटरसाइकलस्वारास बनावट ई पासच्या मदतीने जिल्ह्याची सीमा ओलांडण्याच्या प्रयत्नात अटक केली असुन बनावट  ई पास बनवून देणारा व घेणारा या दोघांवरही गुन्हे दाखल केले आहेत.  

देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्रम्हपुरी रोड वैनगंगा नदीचे पुलाजवळ, लाखांदुर रोड सावंगी मध्ये, अर्जुनी रोड फॉरेस्ट नाक्याजवळ या तीनही रोडवर नाकाबंदी लावण्यात आलेली आहे.बुधवारला ब्रम्हपुरी रोड वैनगंगा नदी पुलाजवळ नाकाबंदी दरम्यान एक इसम देसाईगंजकडून ब्रम्हपुरीला जाण्याकरीता मोटरसाईकल (क्र.एमएच 33 एल.4210)ने  येताच गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांनी थांबवुन विचारपुस केली.मुकेश दुर्याधन राऊत,(वय ३१,रा. जुनी वडसा )असे सांगत जवळ ई पास असल्याचे सांगुन ई पास दाखविले. पोलीस जवानांना शंका आल्याने जवानांनी ई पास तपासले असता QR & Barcode Scanner या मोबाईल एपवर ” ई ” पास बनावट असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर अधिक चौकशी केली असता सदर पास हा आरोपीने संतोष बकाराम कोरें,(वय ४४)व्हिजन कॉम्पूटर देसाईगंज यांचे दुकानात बनवल्याचे कबुल केले.यावरुन आरोपी मुकेश दुर्याधन राऊत,(वय ३१,रा.जुनी वडसा) व संतोष बकाराम कोरे(वय ४४) रा. हनुमान वार्ड देसाईगंज यांचे विरुध्द पोलीस स्टेशन देसाईगंज येथे अपराध क्रमांक ०१३०/२०२० कलम ४१९, ४६५,४६८,४७१,३४,१८८ भादंविसह कलम ६६(सी), ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रदिप रामनाथजी लांडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रुपाली बावणकर, पोशि संतोष नागरे, पोना श्रीकांत आलाम,  साळवे, भुमीअभिलेख, उईके आरोग्य विभाग,  आर. एम. मेन्डे, शिक्षक, नगरपरिषद देसाईगंज यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास सुरु असुन उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत भवर यांचे मार्गदर्शनााली पोलीस निरीक्षक प्रदिप  लांडे  करीत आहेत.