34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता एका निष्पाप शेतकर्याची आत्महत्या

एका निष्पाप शेतकर्याची आत्महत्या

0
598

blank

गोंदिया,दि.21ः-जिल्हयातील सालेकसा पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या आमगाव तालुक्यातील वडद येथील एका शेतकर्याच्या शेतातील वाळुचा अवैधरित्या उपसा केल्याचा ठपका ठेवत ठेकेदार अनिल बिसेन यांना 14 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला होता.त्यानंतर काही दिवसांनीच सदर शेतकरी गजानन पारधी (वय -65) हे  19 मे रोजी रात्रीलाच बेपत्ता झाले होते.मात्र आज(दि.21) त्यांचा मृतदेह गावातीलच विहीरीत आढळून आल्याने खळबळ माजली आहे.सदर व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार मृतकाचा मुलगा संतोष गजानन पारधी यांनी सालेकसा पोलिसात आज सकाळी नोंदवली होती.विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

blank