28.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या

0
2337

गोंदिया ,दि.२५: कर्जबाजारी आणि कोरोनाच्या संकटाला कंटाळून शेतकऱ्यांने आपल्या शेतातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रावणवाडी येथे सोमवार, 25 मे रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. श्यामलाल गराडे (वय 60) असे त्या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, श्यामलाल गराडे यांनी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या शेतकऱ्याला बँकांचा कर्ज कसा फेडायचा असा प्रश्न निर्माण झाला. याला कंटाळून श्यामलाल गराडे यांनी स्वत:च्या शेतात गळफास घेवून आत्महत्या केली. रावणवाडी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे