25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता अवैधरित्या घरी दारू विकणा-यावर कारवाई

अवैधरित्या घरी दारू विकणा-यावर कारवाई

0
615

गोंदिया,दि.26ःशहर पोलिस ठाण्यांतर्गत सिव्हील लाईन येथे घरीच अवैधरित्या देशी-विदेशी तसेच बिअर आदी प्रकारची दारू विक्री करतांनाची माहिती पोलिसांनी मिळाली, त्या आधारावर पोलिसांनी कारवाई करून आरोपीच्या घरून ३८ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना २४ मे रोजी घडली. सविस्तर असे की, उपविभागीय पोलिस अधीक्षकारी आपल्या पथकासह कोरोना संसर्गजन्य रोग प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहितीच्या आधारावर सिव्हील लाईन येथील कमलेश केशवराव पडोळे (५२) हा आपल्या घरी देशी-विदेशी दारू तसेच बिअर विक्री करीत असल्याचे आढळून आले. दरम्यान त्याच्या घराची छानणी घेतली असता, त्याचा घरून एवूâण ३८ हजार ७८० रुपयांची दारू मिळून आली. फिर्यादीच्या तक्रारीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे