भंडारा,दि.26– स्थलांतरित नागरिक त्यांच्या मूळ गावी जाणाच्या प्रयत्नातून मतदारसंघातील दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आगामी जून, जुलै महिन्यात कोरोनाची होणारी संभावित वाढ लक्षात घेता प्रशासनाने दूरदृष्टीने नियोजन करण्याचे आवाहन खासदार सुनील मेंढे ह्यांनी विभागीय आयुक्त संजीवकुमार ह्यांच्याशी शासकीय विश्रामगृहभंडारा येथे झालेल्या चर्चे दरम्यान केले. बाहेरून येणा-या नागरिकाना संस्थात्मक ्नवरंटाईन होण्यासाठी चांगली व्यवस्था उपलब्ध करून देणे, तसेच ज्यांना स्वखर्चाने हॉटेल मध्ये ्नवारंटाईन व्हायचे आहे, अशा लोकांसाठी माफक दारात हॉटेल उपलब्ध करून देणे ह्यावर देखील बैठकीत चर्चाकरण्यात आली. कोरोना लॉकडाऊन दरम्यान रखडलेल्या विकास कामांना तसेच पंतप्रधान आवास योजेनेंतर्गत घरकुल बांधकामास रेतीची कमतरता भासत आहे.
शासनाने जप्त केलेली रेती एका ठराविक दराने उपलब्ध करून देण्याचा पर्याय खासदारांनी ह्या दरम्यान आयुक्तांना दिला. ह्या भेटी दरम्यान मनरेगाचे कुशल योजनेतील, मागील दोन वर्षाचे प्रलंबित निधी भंडारा ९ कोटी, गोंदिया १७ कोटी तातडीने वितरीत करण्याची मागणी खा. सुनिल मेंढे यांनी केली. विभागीय आयुक्तांनी ती मान्य केल्याचे खासदारांनी सांगितले. तसेच कुशल आणि अकुशल कामगारांचे योग्य नियोजन करण्यासाठी गट विकास अधिकाèयांच्या स्तरावर बैठक आयोजित करण्याची सूचना आयुक्तांना केल्याचे खासदार म्हणाले.





