साकोली,दि.26: रक्तदान मानवी जीवनाचं सर्वात श्रेष्ठदान असून मोकळ्या मनाने दुसऱ्यांचा जीव वाचविण्याचा संकल्प म्हणजे रक्तदान असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.ते येथील नगर परिषद सभागृहात नगर परिषद, साकोली व कोरोना गृपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या कटकवार होत्या.माजी ग्रामपंचायत सदस्य अश्विन नशिने,नगरसेवक सुभाष बागडे, डी.जी.रंगारी, डॉ. अतुल दोनोडे, राजेश बैस मंचावर उपस्थित होते.
करोना रिलीफ ग्रुप तर्फे नगर परिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या नेतृत्वात सदर आयोजन करण्यात आले होते. साकोलीच्या सर्वांगिण विकासाठी लोकांनी नगर परिषदेला सहकार्य करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या बजेटमध्ये साकोलीचे नाव पहिल्यांदा आले आहे. विधानसभा क्षेत्राच्या विकासाठी नियोजन करुन कार्य करणे महत्वाचे असल्याने नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती यावेळी पटोले यांनी केली. उपस्थित मान्यवरांनी देखिल आपले मनोगत व्यक्त केले. रक्तदान शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय भंडाराच्या डॉ. मिरा सोनवाने, सीमा तिजारे, लोकेश गोटेफोडे, राहूल गीरी, राजेंद्र नागदेवे यांनी विशेष सहकार्य केले. प्रास्तविक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले. संचालन व आभार मनिषा काशिवार यांनी केले. शिबिरात शहरातील डॉ. राजेश चंदवानी, मनोहर डोंगरे, अश्विन नशिने, क्रिडा संघटक शाहिद कुरैशी, मनोज नशिने, राजू साखरे, उमेश भुरे, नरेश करंजेकर, निलेश घरडे, सोनू बैराजी यांच्यासह नगर परिषदेतील स्वप्नील हमाने, पंकज माने, शुभम द्रुगकी, नंदकिशोर रेवतकर, शामकुमार नंदेश्वार, भीम गायकवाड व आदिंनी मोलाचे सहकार्य केले. या शिबिरात ५० हून अधिक युवक व नागरिकांनी रक्तदान केले. यामध्ये उमेश कापगते, हर्षल डोंगरवार, मुकेश बडोले, शहीद कुरैशी, नरेश करंजेकर, राजेश बैस, सुभाष बागडे, समीर खान, सतीश भारतद्वाज, सचित लाडे, शामकुमार नंदेश्वार, भिम गडपायले, वसिम खान नदीम पठान, साहिल घोडीचारे, पराग लांजेवार आदींचा समावेश होता. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष बोरकर, प्यारेलाल नंदेश्वार, दिनेश संग्रामे, प्रशांत गायधने, प्रकाश गेडाम बाळकृष्ण् देशमुख, शिशुपाल मेश्राम, केवळ इठोले यांनी परिश्रम घेतले.





