30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख गोंदियाचे सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी

मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख गोंदियाचे सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी

0
1114

मोहाडी,दि.28 : येथील तहसीलदार धनंजय देशमुख यांचे स्थानांतरण सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून गोंदिया येथे झाले असून त्यांच्याजागी भंडार्‍याचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी देवदास बोम्बार्डे हे येणार आहेत.
तहसील कार्यालय मोहाडीचे तहसीलदार धनंजय देशमुख यांचे स्थानांतरण होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. अखेर दोन दिवसांपूर्वी शासनाचा स्थानांतरण आदेश येऊन धडकला. कोरोना काळात कोणत्याही अधिकारी कर्मचार्‍यांचे स्थानांतरण करू नये असे आदेश शासनाचेच आहेत. परंतु विनंती अर्ज केल्यास स्थानांतरण करता येते असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विनंती अर्जावरून तहसीलदार धनंजय देशमुख यांचे स्थानांतरण गोंदिया येथे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून झाले आहे. तर त्यांच्या ठिकाणी भंडारा येथील सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी देवदास बोम्बार्डे यांनी कार्यभार स्वीकारावा, असे आदेशात नमूद आहे.