अकोला दि.28– कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अकोला अंतर्गत कोरोना विषाणूच्या संकटकाळी ‘कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या दारी’ या ब्रीद वाक्यानुसार, शेतकऱ्यांच्या बांधावर खते, बियाणे कृषी निविष्ठा थेट पुरवठा बाबत खते व बियाणे वाटप राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कृषी निविष्ठा वाहनास कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
यावेळी विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, विभागीय कृषी सहसंचालक अमरावती सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) मोहन वाघ, जैविक मिशनचे आरीफ शहा, जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, अरुण वाघमारे, तालुका कृषी अधिकारी डी.एस. प्रधान, तालुका तंत्र व्यवस्थापक विजय शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी के. एम.फुलारी आदी सदस्य उपस्थित होते.





