39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता वनविभागाचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळय़ात

वनविभागाचे दोन कर्मचारी एसीबीच्या जाळय़ात

0
768

blank

नागपूर,दि.28ः वनविभागातील वनपाल व वनरक्षक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. झाडे खरेदी व कटाईबाबत व्यावसायिकाकडून वनपालाने १ हजार तर वनरक्षकाने १ हजार ५00 रुपयांची लाच मागितली होती. एसीबीने रचलेल्या सापळय़ात वनपाल किशोर निंबार्ते व वनरक्षक दशरथ वानखेडे या दोन्ही कर्मचार्‍यांना रंगेहात पडण्यात आले.
यशोधरानगर नागपूर येथील रहिवासी तक्रारकर्ते यांचा शेतकर्‍यांकडून सिवन झाडे खरेदी व कटाईचा व्यवसाय आहे. त्यांनी सावनेर येथील खसरा क्रमांक १९१ मधील ६.२२ हेक्टर परिसरातील संपूर्ण सिवन व आडजात झाडे १00 टन लाकडाचा माल करार करून घेतला होता. त्याअनुषंगाने झाडांच्या कटाईची परवानगी मिळविण्याकरिता वनपरिक्षेत्र कार्यालय खापा ता.सावनेर येथे रितसर अर्ज केला होता. अर्जाबाबत पुढे काय कारवाई करण्यात आली याकरिता तक्रारदार हे दशरथ वानखेडे व किशोर निंबार्ते यांच्याकडे गेले होते. यावेळी वानखेडे यांनी फाईल पुढे पाठविण्याकरिता १ हजार ५00 रुपयांची मागणी केली. तसेच वनपाल निंबार्ते यांना कटाई झालेल्या झाडांचा पंचनामा करण्याकरिता १ हजार रुपयांची मागणी केली. कार्यालयीन प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी नाईक यांना झाडे कटाईची परवानगी पाहिजे असेल तर सदरची केस उपवनसंरक्षक कार्यालय नागपूर येथे पाठविण्याकरिता २ हजार ५00 रुपये मोबदला, असे एकूण ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

blank