29.8 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना पोलीस विभागाने वाटले बियाणे

अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना पोलीस विभागाने वाटले बियाणे

0
327

गोंदिया,दि.29ः जिल्हा पोलीस विभागाद्वारे अतिदुर्गम नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील भागातील शेतक-यांना बियाणांचे वाटप पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल,पोलीस निरिक्षक राजकुमार डुणगे,प्रभारी अधिकारी नक्षल सेल प्रमोद बघेले तसेच तालुका कृषी अधिकारी, सालेकसा उपस्थित होते.

पोलीस ठाणे सालेकसा अंतर्गत येणारे ग्राम मुरकूडोह क्रमांक-1, मुरकूडोह क्रमांक-2, मुरकूडोह क्रमांक-3, दंडारी, टेकाटोला व दलदलकुही हा अतिनक्षलग्रस्त व अतिदुर्गम भाग आहे. या भागातील लोकांचा भात (धान) शेती हा मुख्य व पारंपारिक व्यवसाय आहे. येथील शेतकरी यांनी मोठया प्रमाणात धानाचे उत्पादन घेवून चांगली आर्थिक प्रगती करुन शासनाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे.विश्वासाची व आपुलकीची भावना निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून 250 शेतक-यांना गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे वतीने खरीप हंगाम पेरणीसाठी 1010 या वाणाचे बियाणे (प्रत्येकी 25कि.ग्रॅ.याप्रमाणे) आणि भेंडी, काकडी, वांगी, पालेभाज्या इ. विविध भाजीपाला वाणाचे बियाणे (प्रत्येकी 100 ग्रॅम व 50 ग्रॅम याप्रमाणे) वितरित करण्यात आले.