
गोंदिया दि. २९:: लग्नामध्ये घोड्यांचे महत्व खूप जास्त आहे नवरदेव घोडीवर बसल्याशिवाय नवरदेवाला लग्न पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही.लग्नाच्या वरतीची घोड्यामुळे वेगळं वातावरण निर्माण होत असते त्यातच घोड्यासमोर नाचण्याची मजाच काही वेगळी असते. आज कोरोनाच्या संकटामुळे लग्न हे निवडक लोकांमध्ये होत असल्यामुळे आणि सोशल डिस्टन्स चे पालन करावा लागत असल्यामुळे आज लग्नामध्ये वरात पण निघत नाही. त्यामुळे लग्नसराईच्या या मोसमात घोडे है घरीच असल्यामुळे त्यांच्यामुळे घोड्याच्या मालकांना होणारा नफा हा शून्य आहे पण त्याच वेळी त्यांच्यावर होणारा खर्च हा मात्र सुरूच आहे मिळालेल्या माहितीनुसार एका घोडा एका दिवसाला जवळपास दोनशे तीनशे रुपये खर्च येतो उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना त्यांच्या अन्नाच्या सोबतच राहण्याकरता विशेष सोय करावी लागत असते त्यामुळे त्यांच्यावर होणारा खर्च हा घोडा मालकांच्या आवाक्याच्या बाहेर होत असल्यामुळे शासनाने घोड्यांचा चारा पाण्याची व्यवस्था करावी आणि या संकटातून त्यांना काही दिलासा दिलासा देण्यात यावे अशी मागणी गोंदियाचे घोडा जिल्हा घोडा असोसिएशन चे घनश्याम पटले यांनी केली आहे.
जिल्ह्यात 40 च्या वर घोड्यांची संख्या आहे.या व्यवसायावर हातमजुरी करणारे लोकांचा रोजगार अवलंबून आहे .एका घोड्या मागे 4 लोकांना रोजगार मिळत असते.सध्या निर्माण झालेल्या परिस्थिती मुळे घोडा व्यावसायिकांवर आलेल्या संकटात घोड्यांना जिवंत ठेवणे कठीण झाले असून जिल्हा घोडा असोसिएशन तर्फे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची भेट घेऊन घोड्यांना जिवंत ठेवण्याकरिता लवकरात लवकर चाऱ्यापाण्याची व्यवस्था करावी आणि घोड्यांना चारापाणी उपलब्ध करून देऊन कोरोनामुळे आलेल्या संकटातून दिलासा देणारा निर्णय कधी होतो यावर जिल्ह्यातील घोडमालकांच्या नजरा टिकून आहेत.





