25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्ह्यात आज नवे दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले

भंडारा जिल्ह्यात आज नवे दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले

0
743

भंडारा दि.३१ः जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. परराज्यात आणि बाहेर जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले जिल्ह्यातील नागरिक,कामगार जिल्ह्यात दाखल होत आहे. त्यामुळे बधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नागपूरच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून आज 31 मे रोजी प्राप्त अहवालापैकी 2 (साकोली) रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आता जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 31 इतकी झाली आहे.यामध्ये क्रियाशील रुग्ण 30 इतके असून एक रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाला आहे. दरम्यान पहिल्या करोना रुग्ण निघालेल्या गराडा येथील महिलेचा नागपूर येथे उपचारादरम्यान आज मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
साकोली तालुक्यातील दोन रुग्ण आज (31 मे) पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे.
ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.

आतापर्यंत 1791 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी 31 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 1613 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 147 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
आज 31 मे रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 35 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 310 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नर्सिंग होस्टल भंडारा क्वारंटाईन मध्ये 13 व्यक्ती भरती आहेत. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 344 असे एकूण 357 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये भरती आहेत. 1156 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई व इतर राज्यातून 39395 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 26640 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 12755 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी 28 दिवस घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.