27 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ रेती तस्करावर कोरोनाची कृपा,पिपरी घाटावरुन रेतीचा उपसा

रेती तस्करावर कोरोनाची कृपा,पिपरी घाटावरुन रेतीचा उपसा

0
396

सडक अर्जुनी(भामा चुर्हे)दि.03ःदेश व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. परंतु, या संधीचा लाभ घेत रेती माफिया अधिक सक्रीय झाले असून राजरोसपणे अवैधरित्या उत्खनन करून रेतीची वाहतूक केली जात आहे. असाच प्रकार तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातील पिपरी रेती घाटावर दिसून येत असून रात्री-बेरात्री रेतीची वाहतूक केली जात आहे. या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष की रेती माफीयांना अभय? असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातील पिपरी घाटातून रेतीचा उपसा करुन तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. घाटावरील पिपरी पुलावरील मंदिराजवळ एक हेक्टर जागेत जेसीबी मशीनने रेतीचा उपसा करून ती रेती रात्रीच्या दरम्यान ८ ते १0 ट्रक्टर माध्यमातून इतरत्र वाहतूक केली जात आहे. एकीकडे अधिकारी कोरोनाशी दोन हात करत असतांना दुसरीकडे रेती तस्कर या संधीचा लाभ घेत आपले चांगभंल करीत आहेत. या प्रकाराला स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीची कृपादृष्टी असल्याचे बोलले जात आहे. पिपरी घाट सौंदड येथून दोन किमी अंतरावर असून रेतीचे ट्रक्टर सौंदड गावातूनच राष्ट्रीय महामार्गवरुन जातात. सौंदड येथील पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या घरासमोरून तासी ५0 च्या वेगाने ट्रक्टर रात्रभर गावातून जातात. मग शासनाची संचारबंदी व लॉकडाऊन कुठे आहे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. जिल्हाधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी २१ मे ला आदेश निर्गमित करून रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीची अधिसुचना नियमित केली आहे. फौजदारी प्रतिक्रीया संहीता १९७३ चे कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू असुन संचारबंदीचे उल्लघंन केल्यास भारतीय दंड संहिता १८६0 चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्याची तरतुद आहे. असे असूनही रेती तस्करांना कुणाचा धाक नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच सौंदड येथील आपत्ती व्यवस्थापन समिती वैयक्तीक राजकारण करून या रेती तस्करांना संरक्षण देत असल्याचा आरोपही गावकरी करीत आहेत.blank

सौंदड गावात जीवनावश्यक वस्तुचे दुकान रात्री ८ वाजेपयर्ंत सुरू राहतात. याबाबत शंकर डोंगरवार यांनी सरपंच व आपत्ती व्यवस्थापन समितीला तक्रार केली होती. मात्र, सरपंच व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य हे शंकर डोंगरवार यांना त्रास देत आहेत. गावात अनेक दुकान रात्री ७ ते ८ वाजेपयर्ंत सुरू असतात, याकडे ग्रा.प.दुर्लक्ष करीत आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये सरपंचाने राजनितीक भावनेने आपल्या मजीर्तील सदस्य व लोकांना ठेवले आहे. जि.प.व पं.स.सदस्य हे स्थानिक सौंदडचे असून त्यांना या समितीत स्थान दिले नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीवर नियंत्रण ठेवून रेती तस्करांनाही अभय दिले जात असल्याचे चर्चा सौंदड गावात सुरू आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.