अर्जुनी-मोर(संतोष रोकडे)दि.03ःगोंदिया कोहमारा अर्जुनी मोर वडसा हा राज्य महामार्ग क्रमांक २७५ असून हा महामार्ग गोंदिया-भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे मात्र नावापुरताच उरलेला राज्य महामार्ग सध्यास्थितीत अखेरच्या घटका मोजत आहे
या राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले असून या महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण असून जीव मुठीत घालूनच प्रवास करावा लागतो मात्र निगरहट्ट सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नाही व या राज्य महामागार्चे नव्याने काम केव्हा होणार असा प्रश्न या राज्य महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी विचारीत आहेत
डिसेंबर २0१८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खामकुरा गावानजीक या रस्त्यावर बेर्शम ची झाडे लावून व टायर जाळून आंदोलन केले होते त्यावेळी थातूरमातूर खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्यात आले होते मात्र परत या रस्त्याची अवस्था जैसे थे झाली आहे काही दिवसांपूर्वी या राज्य महामार्गावर जागोजागी पडलेल्या खाद्यात कुठे मुरूम तर कुठे रेती सिमेंट बारीक गिट्टी टाकून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले मात्र चारचाकी वाहनांनी या रस्त्यावरील टाकलेल्या मिर्शणामुळे धुरळा उडतो व त्या धुरामुळे समोरून येणार्या वाहनचालकाला काही दिसेनासे होते संपूर्ण राज्य महामार्ग धुळात दिसेनासा होतो व या धुरामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे या धुरामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही सद्यस्थितीत उन्हाळा असल्याने आवागमन करणे शक्य असले तरी पाऊस तोंडावर येऊन ठेपला आहे पावसात या राज्य महामार्गावरून प्रवास करणे कठीण होऊन बसते खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे समजायला जागाच उरत नाही त्यामुळे अनेकदा या राज्य महामार्गावर अपघात होऊन जीव आणि सुद्धा झाली आहे काही दिवसापूर्वी या राज्य महामार्गावरील शिडी वर्क काम करण्यात आले त्यामुळे या महामार्गाचे काम होऊन या रस्त्यावरून जायला मिळेल अशी आशा पल्लवित झाली होती मात्र पावसाळा तोंडावर येऊनही या महामार्गाची दैनावस्था जैसे थे असूनही येणार्या पावसाळ्यात सुद्धा प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागणार आहे जनसेवेचा आव आणणारे जनप्रतिनिधी झोपले आहेत काय असा प्रश्न परिसरात विचारला जात आहे.
राज्य महामार्ग २७५ देणार रोगांना आमंत्रण
चुरीमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम





