34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ कोरचीत वादळी पावसामुळे मोठे नुकसान

कोरचीत वादळी पावसामुळे मोठे नुकसान

0
171

blank

कोरची,दि.05: तालुक्यात ३ जूनच्या संध्याकाळी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.२४ मेच्या रात्रीपासून रोहिणी नक्षत्रास सुरुवात झाली. परंतु आठवडाभर वातावरण तापलेलेच राहिले. परंतु काल रोहिणी बरसल्या. गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज, कुरखेडा व कोरची या पूर्वोत्तर भागातील तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. कोरची येथे संध्याकाळी वादळी पाऊस पडल्याने अनेक घरांवरील कौलारु व टिनाचे शेड उडाले. काही ठिकाणी रस्त्यावर, तसेच वाहने आणि वीज तारांवर झाडे कोसळली. वीज तारा तुटल्याने वीजपुरवठा बराच वेळ खंडित होता. प्लॉस्टिकच्या पाण्याच्या टाक्याही फुटल्या. तालुक्यातील कोरची, गुटेकसा, जांभळी, पन्नाभटी, खुनारा व अन्य गावांमध्येही मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

blank