25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home गुन्हेवार्ता बंगल्यात जळालेल्या अवस्थेत आढळला सेवानिवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यासह पत्नीचा मृतदेह

बंगल्यात जळालेल्या अवस्थेत आढळला सेवानिवृत्त उपजिल्हाधिकाऱ्यासह पत्नीचा मृतदेह

0
379
अकोला,दि.05ः अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बळवंत कॉलनीत भगत दाम्पत्याचे जळीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. ही घटना कशामुळे घडली आणि यामागे काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
अकोला शहरातील बळवंत कॉलनी परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आले. मृतक भगत हे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी असून त्यांच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास खदान पोलीस करत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह आढळलेल्या सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भगत यांच्या बंगल्यात त्यांच्या पत्नीसह दुसरे कोणीही कुटुंबीय राहत नव्हते. घरात आग लागून जीव गुदल्यामुळे भगत दाम्पत्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, घात की अपघात? याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.भगत यांच्या नातेवाईकांचा पोलिसा शोध घेत आहेत. सेवानिवृत्तीनंतर उपजिल्हाधिकारी भगत हे पत्नीसह बंगल्यात राहात होते. त्यांच्याकडे फारसे कोणी येत जात नव्हते अशी माहिती समोर आली आहे.