नागपूर, ६ जून: कोविड १९ मुळे प्रत्येकाला चांगले -वाईट दिवस बघायला मिळत आहेत. त्यातीलच एक प्रसंग नागपूरचे हरिहर पांडे यांचेसह ५० प्रवाशांना आला. लॉकडाऊन पूर्वी Goair च्या नागपूर – मुंबई तिकीट बुक केल्या असता २६९५ रूपयेप्रमाणे ५० ग्रुप तिकीट खरेदी करण्यात आल्या, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जुलै महिण्यातील प्रवास टाळून पुढे ६ महिण्यांनी प्रवास करायचा विचार केल्यास तेव्हा भाडे तब्बल ६४२० रूपये लागणार आहेत. Goair कडे पैसे जमा असल्यामुळे ५० प्रवाशांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप हरिहर पांडे यांनी केला आहे.
विमानप्रवासाच्या बाबतीत अनेक मंडळी काही महीने आधीच आपली तिकीट बुक करून ठेवतात. आधीच बुकिंग करून ठेवलं तर तिकीट कमी किमतीत मिळते हा उद्देश् असतो. मात्र कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पुढे दोन-तिन महीने प्रवासी प्रवास करणे टाळणार. आणि त्यातही ५० व्यक्तींचा समूह तर टाळणारचं हे मात्र नक्की!
याचा गैरफ़ायदा GoAir घेताना दिसते. सविस्तर माहिती अशी की, १७ मार्च रोजी नागपूरचे हरिहर पांडे यांनी जुलै महिण्यातील ५० ग्रुप तिकिटे बुक करून ठेवली आहेत. त्याचे २६९५ रूपये प्रति सीट प्रमाणे ५० तिकिटांचे १३४७५० रूपये GoAir कडे नागपूर विमानतळावर जमा केले.
कोरोनामुळे तिकीट रद्द करून परतावा मिळणे संदर्भात GoAir ला वारंवार विनंती केली असता पैसे परत करण्यास स्पष्ट नकार दिला. या परिस्थितीत प्रवाशांना त्याच किंमतीत पुढेही प्रवास करता येईल. कुठल्याही अतिरिक्त रकमेशिवाय तिकीट Reschedule करून देऊ, असे संकेतस्थळावर सांगणारे GoAir मात्र प्रत्यक्ष प्रवाशांची लूट करताना दिसते.
हरिहर पांडे यांनी २९ डिसेंबर २०२० साठी Reschedule करीता विनंती केली असता १८६२५० रूपये पुन्हा जमा करावे लागेल, असे सांगितले. ५० प्रवाशांसाठी एकूण ३२१००० रूपये खर्च येईल म्हणजेच प्रति प्रवासी ६४२० रूपये भाडे लागणार आहे.
आजपासून जवळपास ६-७ महिण्यानंतरचे भाडे निश्चितच कमी राहील. भाड्यामधे सूट मिळेल, आपली रक्कम उपयोगात येईल म्हणून Reschedule चा पर्याय स्विकारण्यात आला.
आजपासून ६-७ महिण्यानंतरच्या तिकीटा इतर कंपन्या २५००/- रूपयांत सहज मिळतात. जर आमचे पैसे Goair कडे जमा नसते तर आम्ही तो पर्याय स्विकारला असता, मात्र इथे १३४७५०/- रूपये जमा असल्यामुळे इतर पर्याय स्विकारता येत नाही. ही बाब Goair जाणून आहे, याचा गैरफायदा घेत जाणूनबुजूण आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे.
संकटकालीन परिस्थितीतही Go Air प्रवाशांच्या सुविधेचा विचार न करता, स्वतःच्याच फायद्याचा विचार करताना दिसते, हे निश्चितच चुकीचे आहे. अशा आर्थिक लुबाडणुकीची दखल नागरी हवाई वाहतूक मंत्रालय महासंचालनालयाने घेणे गरजेचे आहे. विमान कंपन्यांनी स्वतःच्या फायद्यासोबत प्रवाशांचेही हित जोपासावे असे आदेश DGCA ने यांना द्यावेत. प्रवाशांना त्वरीत परतावा मिळावा, असा आदेश सरकारने काढावा अशीही मागणी हरिहर पांडे यांनी केली आहे.
कोरोनाचा गैरफायदा; “GoAir” करतेय ५० प्रवाशांची आर्थिक कोंडी -हरिहर पांडे यांचा आरोप
६ महिन्यानंतरचे नागपूर- मुंबई भाडे ६४२० रूपये





