23.9 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता उपजिल्हाधिकारी भगत दाम्पत्याची यासाठी केली हत्या

उपजिल्हाधिकारी भगत दाम्पत्याची यासाठी केली हत्या

0
983

अकोला, ६ जूनः येथील बळवंत कॉलनीतील वृद्ध दाम्पत्याच्या काल शुक्रवारला झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बारा तासांतच प्रकरणातील मुख्य सुत्रदारांना बेड्या ठोकल्या.शुक्रवारच्या सकाळी सेवानिवृत् उपजिल्हाधिकारी नत्थुराम भगत आणि त्यांची पत्नी हेमलता यांचे मृतदेह घरात जळालेल्या स्थितीत आढळले होते.त्यांचा एक मुलगा बँगलोर येथे तर एक मुलगी सोलापूर तर दुसरी अकोल्यात राहते.शुक्रवारला सकाळी घरातून धूर निघत असल्याने घरातील भाडेकरूंनी आरडाओरड केली. दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता दांपत्य मृतावस्थेत आढळून आले.दरम्यान,पोलीस तपासात या वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याचे समोर आले. भगत यांच्या घरातील भाडेकरू महिलेने चोरीच्या उद्देशाने भावाच्या मदतीने या दांपत्याची हत्या केल्याचे समोर आले.आरोपी महिला भाडेकरू महमुदाबी परवीन वसीम आणि भाऊ मोहम्मद रफीक मोहम्मद हमजा यांना काल संध्याकाळी अटक करण्यात आली असून पोलीसांनी दोन्ही आरोपींकडून 5.72 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.