24.3 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ कागद विरहित ऑनलाईन वीज बील भरा आणि मिळवा वर्षाला १२० रुपयांची सूट; महावितरणचे...

कागद विरहित ऑनलाईन वीज बील भरा आणि मिळवा वर्षाला १२० रुपयांची सूट; महावितरणचे आवाहन

0
337

नागपूर, दि. 8 जून:-महावितरण ने ग्राहकांना वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने  जाहीर केली आहे. महावितरणच्या ग्राहकांनी  या सवलतीचा लाभ घेतल्यास त्यांना वर्षभरात १२० रुपयांची सूट मिळणार आहे.त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन वीज भरतांना या सवलतीचाही  लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

 वीजबील ऑनलाईन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. अशा सर्व ग्राहकांना   १ डिसेंबर  २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर https://billing.mahadiscom.in/gogreen.php येथे जाऊन करावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.

गो-ग्रीनचा पर्याय स्वीकारणाऱ्या वीज ग्राहकांची पारमंडलनिहाय संख्या पुढील प्रमाणे आहे. नाशिक-४४ हजार १९७,अकोला -४ हजार २९५,अमरावती-३ हजार ३३५,चंद्रपूर-१ हजार ६०४,गोंदिया -१ हजारी ८१, नागपूर-१५ हजार ६६५,बारामती-९ हजार ३९२,कोल्हापूर -७ हजार ६५६, पुणे-२९ हजार ४३६, औरंगाबाद – ६ हजार २८, लातूर- ४ हजार ५६८, नांदेड-३ हजार ३८९ , भांडुप- ११ हजार ५०९, जळगाव – ६ हजार ४, कल्याण- १२ हजार १२९, रत्नागिरी- २ हजार २६.

गो-ग्रीनचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना ई-मेलवर तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही त्यांना सोपे ठरणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने  केले आहे .