गोंदिया,दि.11ःगोंदिया जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त झालेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.ई.ए.हाश्मी यांच्याकडे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी सोपविलेल्या जबाबदारीतूनही 10 जून रोजी मोकळे करण्यात आले आहे.विशेष म्हणजे बेरार टाईम्स पोर्टलने 10 जून रोजी “सेवानिवृत्त अति.सीईओंचा जि.प.च्या कारभारात अतिक्रमण,बांधकाम विभाग लावतोय कोट्यावधीचा चूना”या मथळ्याखाली या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.त्या वृत्ताचा चांगलाच दणका जिल्हा प्रशासनावर बसलेला आहे.10 जून रोजी जिल्ह्यातून करोनाबाधीत एकमेव रुग्ण जरी मुक्त होऊन घरी गेला असला तरी गावखेड्यातील अनेक संस्थात्मक विलगीकरण केंद्रात हजारो नागरिक आजही आहेत.त्यातच शेल्टर होम व कंटेनमेंट झोनच्या उपायोजनात्मक व प्रतिबंधात्मक कामासाठी हाश्मी यांना सेवानिवृत्तीनंतरही सेवेत कायम ठेवत त्यांना जिल्हा परिषदेचे एक वाहन उपलब्ध करुन देण्यात आले होते.जरी त्यांना एक्टीव्ह रुग्ण व शेल्टर होम नसल्याचे कारण देऊन मुक्त करण्यात आले असले तरी 9 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील मानव विकास कार्यालयात बांधकाम व लपा विभागाचे कागदपत्र बोलावून त्यात काही हस्तक्षेप करण्याचा केलेल्या प्रयत्नामुळेच त्यांना लगेच कार्यमुक्त करण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणने आहे.




