गडचिरोली,दि.11: कोरोना महामारीमुळे सर्वांना आपल्या जीवन पध्दतीत आमुलाग्र परिवर्तन करायला भाग पाडले आहे. पारंपारीक नियमात बदल करुन आपल्या सोईनुसार कार्यक्रम पार पाडत आहेत. मौजा नवेगांव (मुरखळा) येथील सुशिल प्रभाकर कोटरंगे याचा विवाह पारडी येथील कमलताई वसंतराव सोनुले यांची कन्या यामिनी हीच्या सोबत ठरल्याप्रमाणे विवाहाची तारीख 6 एप्रिल होती. परंतु कोरोना संसर्गामुळे राज्यात संचारबंदी लागु करण्यात आली. त्यामुळे थाटामाटात होणारा विवाहाचा आनंदोत्सव रध्द करुन अगदी साध्या पध्दतीने विवाह 7 जून 2020 रोजी पारडी येथे उरकण्यात आला. शासनाच्या नियमावलीचे पालन करीत वधुच्या घरी अतिशय साधेपणाने विवाह सोहळा पार पाडला. यावेळी मौजा पारडीचे सरपंच संजय निखारे , सदस्य अशोक सोनुले , रामेश्वर सोनुले हे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी कोवीड- 19 च्या पार्श्वभुमीवर सजग राहून वधु व वर पक्षाकडील मोजकेच नातेवाईक मास्क लावुन विवाह सोहळयाला उपस्थित होते.





