गोरेगाव,दि.12ः तालुक्यातील हलबीटोला तेढा येथे अंगणवाडी इमारत मंजूर झाली आहे. त्या इमारतीचे भुमिपूजन (दि.१०) संपन्न झाले.कार्यक्रमाला जि.प.सदस्य ज्योतीताई वालदे, सरपंच रत्नाकला भेंडारकर, उपसरपंच डॉ.विवेक मेंढे, मनोज वालदे, पुरुषोत्तम ब्राह्मणकार, ग्रा.प.सदस्य उमेश शहारे, कविताबाई नाईक, वच्छलाबाई राऊत, माजी सरपंच सावलराम ताराम, धनिराम भंडारी, वनवासु कुंबडे, रमेश ताराम, डोमन कुंबडे आदि उपस्थित होते. विशेष म्हणजे, भुमिपूजन कार्यक्रम कोरोना विषाणूची खबरदारी घेत फिजिकल डिस्टिन्सींग पाळून पार पडला. याप्रसंगी उपस्थित पदाधिकार्यांनी देखील नागरिकांना कोरोना विषाणूची आपत्ती टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले.





