30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home गुन्हेवार्ता भांडणाचा वाद सोडवणाऱ्या वृद्धाचा खून

भांडणाचा वाद सोडवणाऱ्या वृद्धाचा खून

0
455

गोंदिया,दि. १२: :– शहर पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या शास्त्री वॉर्ड येथील पटेल चौक येथे जुन्या वादावरून भांडण सुरु असताना मध्यस्थी करणाऱ्या वृद्धाला आरोपीने काठीने प्रहार केला. या घटनेत वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, मृतकाचे नाव शास्त्री वॉर्ड निवासी निलू समरशिंग यादव ६५ वर्ष असे असून आरोपी चे नावे शंकर उर्फ गुरु पटेल २५ वर्ष, इमरान खान २० वर्ष, रोहन बल्ले २४ वर्ष व इतर दोघांचा समावेश आहे या पैकी ३ आरोपीना पोलिसांनी अटक केली असुन २ आरोपी पोलीस ताब्यातून बाहेर आहेत हि घटना काल ११ जून च्या रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली शहर पोलीस ठाण्या मध्ये आरोपी च्या विरोधात कलम ३०२ च्या अंतर्गत गुना दाखल करण्यात आला आहे. तर मृत देह गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात साविच्छेदन करण्यासाठी पाठविण्या आले आहे.
सविस्तर असे कि मृतक निलू यादव च्या मुलं सोबत जुन्या भांडणाला घेऊन आरोपी शंकर उर्फ गुरु पटले व इतर ४ आरोपी सोबत भांडण सुरु होते भांडणाचे रूपांतर मारहाणी प्रयन्त पोहचले हि घटना निर्धनात येताच मृतक निलू यादव भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेला. यातील मुख्य आरोपी शंकर पटले याने मृतकाच्या छातीवर काठीने प्रहार केला या घटनेत मृतकाच्या जबर दुखापत झाल्याने घटना स्थळीच निलू यादवांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गोंदिया शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व त्यांचे पथक घटना स्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला व काही वेळातच ३ आरोपीना अटक करण्यात यश आले मात्र २ आरोपी आद्यपही फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आवड यांनी दिली असुन फरार आरोपच शोध सुरु करण्यात आले आहे