30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ तणसाच्या ढिगाला आग लागून जनावरांचा चारा संपुष्टात

तणसाच्या ढिगाला आग लागून जनावरांचा चारा संपुष्टात

0
318

गोरेगाव,दि.१२ः तालुक्यातील तेढा येथील शेतकरी हिरामण यदु शेन्डे यांच्या घराजवळ ठेवलेल्या तणसाच्या ढिगाला आग लागल्याने जनावरासांठी चारा टंचाई निर्माण झाली आहे.शेतातून तणस आणून ठेवली असताना गोठ्यात भरण्यापुर्वीच आज दुपारी १ ते १.३० वाजताचे सुमारास अचानक आग लागल्याणे तणस जळून खाक झाल्याने त्यांचे ५० ते ६० हजाराचे नुकसान झाले आहे.शासनाने पंचनामा करुन त्यांना त्वरीत मोबदला देण्यात यावा, अशी मागणी तेढा ग्रामपंचायत चे सरपंच रत्नकला काशीनाथ भेंडारकर व समस्त ग्रामवासीयांनी केली आहे.