28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ महसुल कर्मचारी संघटनेनेही नोंदवला हल्ल्याच्या निषेध

महसुल कर्मचारी संघटनेनेही नोंदवला हल्ल्याच्या निषेध

0
350

गोंदिया,दि.13 : रेती माफीयांकडून नायब तहसीलदार आणि तलाठ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना गुरूवारी (दि.११) सकाळी गोंदिया तालुक्यातील तेढवा रेती घाटावर घडली. या घटनेचा महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना शाखा गोंदियाच्यावतीने निषेध करण्यात आला. पथकावर दगडफेक करुन हल्ला करणाºयावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडेंना दिलेल्या निवेदनातून केली आहे.गोंदिया तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नायब तहसीलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना रेतीची चोरी करुन वाहतूक करीत असताना कारवाईसाठी गेले असता ट्रॅक्टर, ट्रक चालक व मालकांसह हमालांनी त्यांच्या पथकावर लाठ्याकाठ्यांसह दगडफेक करुन हल्ला केला होता,त्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी 12 जून रोजी काळ्या फिती लावून काम केले.निवेदन देतेवेळी राजेश मेमन,आशिष रामटेके,राकेश डोंगरे,महेश कंचनवार,सुपचंद सिल्लारे आदी उपस्थित होते.