39 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता डोंगरगाव येथे कोंबडा बाजारावर धाड ; सात आरोपीला अटक ;तर इतर आरोपीला...

डोंगरगाव येथे कोंबडा बाजारावर धाड ; सात आरोपीला अटक ;तर इतर आरोपीला सोडले का?

0
546

मोहाडी ,दि.१६: तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या डोंगरगाव येथे हटवार राईस मिलच्या मागे कोंबडा बाजारावर धाड टाकून आंधळागाव पोलीसांनी तीन कोंबड्या, तीन मोटरसायकल, दोन कात्या अशाएकूण ४४,३९०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र सुरू असलेल्या ठिकाणावर आंधळगाव पोलिसांनी धाड टाकताच तेथील कोंबडा बाजार शौकीन सैरा वैरा पडू लागले.
कोंबडा बाजारात धाड टाकून १२ मोटारसायकल, ७ कोंबडा व रोख रक्कम जप्त केल्याची गुप्त माहिती मिळत आहे. तर इतर आरोपीला पैसे घेऊन सोडण्यात आले का? लॉकडाउन काळात सुद्दा कोंबडा बाजार भरला असल्याची माहिती समोर आली आहे.
आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या डोंगरगाव राईस मिल परिसरात कोंबड्यांवर झुंज लावण्याचा बाजार भरत असल्याची गुप माहिती पोलिसांना मिळाली होती. दि. १४ जून रोजी राईस मिलच्या मागे रविवार दुपारी १.३० वाजेच्या सुमारास कोंबड्यांची झुंज लावण्याचा बाजार भरला होता. आंधळगाव पोलीस पथक कोंबडा बाजार भरत असलेल्या ठिकाणी पोहचताच एकच पळापळ सुरू झाली. यात दशरथ तिजारे (४५), देवा रमेश पाटील (२८), गंगाधर केशवराव नंदनवार (४३),दामू निखारे(६१), मनीष उजैनवार (४५), गोपी नंदनवार सर्व रा. मोहाडी व गणेश बाजीराव निमजे रा. आंधळगाव सदर मुद्देमाल जप्त
करून आरोपीवर १४९/२० कलम १२ (ब) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोंबडा बाजारात ४०-५० लोक जुगार खेळत असून मौक्यावर १२ दुचाकी व ७ कोंबडे मिळाले असल्याचे गुप्त माहिती सांगण्यात येत आहे तर काही जुगार खेळणाऱ्याला आरोपींना व दुचाकी गाडी सोडण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

blank