30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home राजकीय युवकांच्या खांद्यावर राष्ट्रवादीची जबाबदारी

युवकांच्या खांद्यावर राष्ट्रवादीची जबाबदारी

0
561

लाखांदूर,दि.17ःतालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या निर्देशाने माजी मंत्री तथा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धंनजय दलाल, जिल्हा बँक अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाखांदूर तालुकाध्यक्ष बालू चुन्ने यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची बांधणी करण्यात आली.
लाखांदूर तालुक्यातील युवकांचा जोश, मिळत असलेला प्रतिसाद बघता लाखांदूर शहर अध्यक्षपदी अँड. मोहन राऊत, शहर युवक अध्यक्ष अमोल बीडवाईकर, लाखांदूर तालुका युवक अध्यक्ष राकेश राऊत, विद्यार्थी राकाँ अध्यक्ष सुरज मेंढे व भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सचिवपदी देवांनद नागदेवे, जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्षपदी अतुल परशुरामकर यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्य रक्तदान शिबिर कार्यक्रम भंडारा येथे करण्यात आला.
तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष येणार्‍या निवडणुकीत यश संपादन करेल, असा विश्‍वास नाना पंचबुद्धे, धंनजय दलाल, मधुकर कुकडे यांनी व्यक्त केला.
यावेळी यशवंत सोनकुसरे, स्वप्निल नशिने, मिलिंद डोंगरे, धनराज हटवार, अतुल परशुरामकर, देवचंद ठाकरे, हेमंत महाकाळकर, बबन पिलारे, सुभाष दिवटे, शुद्धोधन टेंभूर्ने, रजनीकांत खंडारे, जिक्राभाई पठाण,नितीन तुमाने व अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.
देवभाऊ राऊत,कल्पना जाधव, मानबिन्दू दहिवले, सुनिता बिसेन, शकुंतला भैय्या, हितेश झोडे, ललित दाणे, राहुल फुंडे, संदीप राऊत, राकेश दुनेदार, विशाल नंदपुरे आणि सर्व राष्ट्रवादी लाखांदूरच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.