
गडचिरोली,(जिमाका),दि.18: तहसिल कार्यालय, आरमोरी येथील अवैध रेती/ गौणखनीज पथक गस्त घालीत असतांना पळसगांव रेती घाटावरुन 14 जून रोजी रात्रो 9.00 ते 9.15 च्या दरम्यान सचिन कृष्णाजी मने रा. पळसगांव तालुका आरमोरी हे 01 ब्रास रेती अवैध वाहतूक करीत असल्याचे तलाठी, देऊळगांव श्री. रामटेके, तलाठी चुरमुरा श्री.बोकडे, तलाठी मोहझरी श्री. धात्रक, तलाठी अरसोडा श्री.नागापूर यांचे निर्देशनास आले व त्यांनी सदर ट्रक्टर विना क्रमांकाची स्वराज कंपनीची लाल रंगाची ताब्यात घेतले. सदर वाहन तहसिल कार्यालय, आरमोरी येथे आणण्याकरीता सुरु केले असता वाहन मालकाने ट्रक्टरमधील रेती तेथेच खाली करुन महसूल विभागाच्या ताब्यातील वाहन पळवून नेले.याबाबत ट्रक्टर मालक सचिन कृष्णाजी मने यांना वाहन 15 जून रोजी 5.00 वाजेपर्यंत तहसिल कार्यालयात जमा करण्याबाबत नोटीस देण्यांत आली परंतू वाहन मालक यांनी सदर ट्रक्टर जमा केले नसल्यामुळे 17 जूनरोजी पोलीस स्टेशन, देसाईगंज येथे ट्रक्टर मालक सचिन कृष्णाजी मने यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, असे तहसिलदार, आरमोरी यांनी कळविले आहे.





