27.4 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ शासकीय वळु माता प्रक्षेत्र वडसा येथे जिल्हाधिकारी यांची भेट

शासकीय वळु माता प्रक्षेत्र वडसा येथे जिल्हाधिकारी यांची भेट

0
112

गडचिरोली,(जिमाका),दि.18: जिल्हाधिकारी दीपक सिंगला तसेच  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. विजय राठोड यांनी, दि.18 जून 2020 रोजी शासकीय वळु माता प्रक्षेत्र वडसा येथे भेट दिली.भेटीदरम्यान दीपक सिंगला यांनी प्रक्षेत्राची पाहणी करुन मार्गदर्शन व विकासात्मक कामाची पाहणी केली व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर होणाऱ्या कामासंदर्भात चर्चा केली. यावेळी प्रक्षेत्र व्यवस्थापक डॉ.डी.टी.बाबर, पशुधन विकास अधिकारी, वळु माता प्रक्षेत्र डॉ. प्रतीक इंगळे पाटील तसेच तालपसंचि वडसा येथील डॉ. सचिन भोयर, सनियांत्रक वळू माता वडसा डॉ.कोरणे हे उपस्थित होते.