चंद्रपूर,दि.19ः जिल्ह्यातील राजुरा तालुका शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या चुनाळा या गावातील अल्पभूधारक शेतकर्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे घटना गुरुवारी उघडकीस आले आहे. गजानन गोपाळा कष्टी (३६ वर्षे) असे त्या मृत शेतकर्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आहेत.
प्राप्त माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील चुनाळा गावातील गजानन कष्टी नावाच्या तरुण शेतकर्याकडे जवळपास अडीच एकर शेती असून यावर्षी त्याला कमी पीक आले. त्यातच कापसाला कमी भाव मिळाल्याने त्याचे सर्व अंदाजपत्रक कोलमडून पडले होते. त्यातच आहात आलेल्या तुटपुंज्या पैशात त्यांनी घराचे बांधकाम सुरू केले. घराचे हे काम अद्यापही अपूर्ण आहे.
शासनाने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली होती. त्या योजनेचा आपल्यालाही लाभ मिळेल अशी त्याला अपेक्षा होती. परंतु, शेतकरी सोसायटीचे त्याच्यावर असलेले ८0 हजार रुपयांचे कर्ज माफ झाले नाही. शासनदरबारी चकरा मारूनही कर्जमाफी मिळाली नाही. आधीच काही





