27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ सिलेक्टीव्ह टेंडरमध्ये संकल्प जैन व जफऱ तिगालावरच पीड़ब्लूडी क्र.1 ची मेहरबानी का?

सिलेक्टीव्ह टेंडरमध्ये संकल्प जैन व जफऱ तिगालावरच पीड़ब्लूडी क्र.1 ची मेहरबानी का?

कोरोनाच्या नावावर पीडब्लूडीने गटर व शौचालय दुरुस्तीसाठी खर्च केले कोटी

0
362

खेमेंद्र कटरे/ गोंदिया,दि.18-राज्यात सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने अनेक कांमाना स्थगिती मिळाली.मात्र मार्च महिन्यापुर्वीच येथील जिल्हा सामान्य रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या काही किरकोळ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली होती.त्यामुळे त्यां कामाना प्राधान्याने करण्याबाबत वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याने आठवण पत्र काय दिले सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ च्यावतीने सोन्याचे घबाड सापडल्यासारखेच काम केल्याची चर्चा सुरु झाली आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 1 ते 2 कोटी रुपयाच्या कामासाठी विशेष करुन सिलेक्टीव्ह टेंडर प्रकिया राबविण्यात आली.जेव्हा की काम करायचेच होते तर ओपन ईटेंडर करायला काहीही हरकत नसावी,जर काम अत्यावश्यकच असेल तर.परंतु तसे काही झाले नाही या सिलेक्टीव्ह टेंडरमध्ये 5 टक्केचा वाटा महत्वाचा ठरल्याचे बोलले जात असून ज्या सिलेक्टिव्ह टेंडरसाठी 20-25 निवडक कंत्राटदारांची नावे अधिक्षक अभियंता देबवडकर यांना पाठविण्यात आली होती,त्या यादीत असलेल्या संकल्प जैन व जफऱ तिगाला याच कंत्राटदारांची पात्रता योग्य असल्याचे कार्यकारी अभियंत्याना कसे कळले हा प्रश्न सध्या शहरातील सर्वच कंत्राटदार वर्गात चर्चेचा ठरला आहे.त्यातच काही दिवसापुर्वी करण्यात आलेला डांबरीकरणाचा दर्जा सुध्दा निकृष्ठ स्तरातील असल्याची ओरड निर्माण झाली होती.                                                                               कोरोना संसर्गात जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात येऊ शकते अशी माहिती अधिक्षक अभियंत्याना देत त्या कामाचे ईटेडंर करण्याएैवजी सिलेक्टीव्ह टेंडरकरीता निवडक २०-२५ कंत्राटदारांची यादी पाठवून मंजुरी घेण्यासाठी एवढा खटाटोप का करण्यात आला हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.यातच सर्वांनांच ते काम कुठले अशा प्रश्न मनात नक्कीच सर्वांच्या येईल… ते काम म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका शौचालयाचे गटर टँक रिपेयर करणे…दुसरे काम शौचालयाची दुरुस्ती करणे…तिसरे काम बाई गंगाबाई महिला रुग्णालयात किरकोळ दुरुस्ती व रंगरगोंटीसह अन्य एका कामाचा त्यात समावेश आहे.आता ही कामे किती रुपयाची…हा सुध्दा महत्वाचा प्रश्न…तर गटर टँक दुुरुस्तीसाठी २५ लाख रुपयाचे कंत्राट देण्यात आले.शौचालयाच्या किरकोळ दुरुस्तीसाठी २५ लाख रुपयाचे कंत्राट देण्यात आले.बाई गंगाबाई रुग्णालयासाठी २५ लाख रुपये आणि अन्य एका कामासाठी २५ लाख रुपये असे १ कोटी रुपयाचे नियोजन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी उपअभियंत्यांना सोबत घेत कोरोना काळात अतिमहत्वाचे म्हणून केले.यापैकी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गटर व शौचालयाचा काम संकल्प जैन नामक कंत्राटदाराला तर उर्वरित दोन काम हे जफर तिगाला नामक कंत्राटदाराच्या नावे दिली गेली आहेत.त्या कामांकडे बघितल्यास सर्वसामान्य व्यक्तीच्या घरातील गटर टँकचे सुध्दा दुरुस्तीसाठी १ लाख रुपये खर्च येत नसतांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या सामान्य रुग्णालयाच्या गटर दुरुस्तीसाठी २५ लाख,शौचालयाची अशी कुठली दुरुस्ती आहे की त्यासाठी २५ लाख रुपये खर्च यायला लागले आणि अन्य त्या दोन कामांचेही तसेच आहे.असो त्यातही जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात कितीही इमारती वेगवेगळ्या असल्या तरी तो परिसर एकच असल्याने एकाच कंत्राटदाराला ते काम क्लब करुन द्यायला हवे होते.परंतु तसे  काम का देण्यात आले नाही.त्यातच जे हे चार काम कार्यकारी अभियंता यांनी कोरोना काळात दिले ते फक्त दोन कंत्राटदारांनाच कसे दिले.त्या कंत्राटदारांनाच गटर व शौचालय दुरुस्तीचे काम येते काय इतरांना नाही काय असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून कार्यकारी अभियंत्यांनी नियमबाह्य कोरोनाच्या नावावर केलेल्या या प्रकाराची अधिक्षक अभियंत्यालाच नव्हे तर राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही तक्रार झाल्याचे वृत्त समोर येऊ लागले आहे.