33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ तहसीलदाराकडून शेतक-यांची थट्टा

तहसीलदाराकडून शेतक-यांची थट्टा

0
435

blank

तिरोडा,दि.19ःतालुक्यातील किडंगीपार येथे राष्ट्रीय महामार्ग बांधकामाकरिता थ्रेशर मशीनने खडी फोडण्यासाठी शेतकर्यांनी परवानगी दिली. मात्र बाबरिक कंपनीकडून शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार काम होत नसल्याने शेतकर्यांनी याची तक्रार तिरोडा तहसीलदाराकडे केली.मात्र तहसीलदारांनी सदर कंपनीवर कारवाई करण्याऐवजी
शेतकरीच सदर कंपनीला ब्लॅकमेल करत असल्याचा ठपका ठेवला. शेतकर्यांना ही बाब कळल्यानंतर यावर तीव्र
नाराजी व्यक्त करीत तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तालुक्यातील किडंगीपार येथील बाबरिक वंâपनी विरोधात शेतकNयांच्या अनेक दिवासांपासून तक्रारी आहेत. या
वंâपनीतपेâ नियममांचे उल्लंघन करून काम केले जात असल्याची तक्रार सुध्दा अनेकदा केली. तसेच याकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकNयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सुध्दा काढला होता.मात्र यानंतरही संबंधित विभागाने सदर कंपनीवर कुठलीच कारवाई केली नाही. त्यानंतर सदर कंपनीतर्फे नियमानुसार काम होत नसल्याची तक्रार शेतकर्यांनी
तहसीलदारांकडे केली होती. त्यांची याची चौकशी केली मात्र या चौकशीत कंपनीवर कारवाई करण्याऐवजी तक्रार करणार्या
शेतकर्यांवर ठपका ठेवला.विशेष म्हणजे सदर कंपनीकडून ठरवून दिलेल्या खोलीपेक्षा जास्त उत्खनन करणे,कंट्रोल ब्लास्टिंग न करता खुल्या परिसरात ब्लास्टिंग करणे,ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या घराना भेगा पडणे, शेतकर्यांच्या
शेतीवर विपरित परिणाम होणे,सायंकाळी ६ नंतर अवैधरित्या वाहतूक करणे हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. मात्र याकडे तहसीलदारांनी दुर्लक्ष करून उलट तक्रारकत्र्या शेतकर्यांनाच आरोपी केल्याने शेतकर्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त
आहे.

blank