आमगाव,दि.19 : तालुक्यातील वळद व तिगाव येथील अवैध वाळू चोरीचा बिंग फोडणार्या पत्रकाराचा वचपा काढण्यासाठी केलेल्या हल्ल्यात नरेश बोपचे हा पत्रकार गंभीर जखमी झाला होता, सदर प्रकरणात एक आरोपीला अटक करण्यात आली असून१८ जुन रोजी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील अनेक ठिकाणी वाळूचे अवैध उत्खनन सुरू आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवून वाळू चोरांनी धुमाकूळ घातला आहे. या वाळू चोरीचा सुगावा पोलिस व तहसीलदार प्रशासनाला माहिती देऊन याविरुद्ध मोहीम काहींनी राबविली आहे. यातच वळद येथील अवैध वाळू उपसामूळे वाळू चोरांवर दीड कोटींचा दंड प्रशासनाने घातला होता, तरी मात्र वाळू चोरांवर काहीच परक पडला नसून वाळू तस्करी वाढली आहे. अवैध वाळू चोरांची माहिती प्रशासनाला देणार्यांचा वचपा काढण्यासाठी काहींनी यात पुढाकार घेतल्याची माहीती आहे. काल बुधवारी १७ जूनला सकाळी गजानन रहांगडाले रा.कालिमाटी ता. गोरेगाव यांनी तिगाव परिसरातून वाळूचे ट्रेकटर घेऊन जातानी दिसल्यास नरेश बोपचे या युवकाने पोलीस व तहसील प्रशासनाला माहिती दिली. यात पूर्वीच वळद प्रकरणात व आता सुरू असलेल्या वाळू चोरीची माहिती प्रशासनाला नरेश बोपचे देतो याचा राग धरून त्याचा वचपा काढण्यासाठी आरोपी गजानन रहांगडाले व इतरांनी बोपचेवर प्राणघातक हल्ला करून जखमी केले होते. यात प्रारंभी नरेश बोपचेला आमगाव येथे प्रथम उपचार करून पुढे उपचारासाठी गोंदिया येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी गजानन रहांगडाले याला अटक करून त्याच्याविरुद्ध भादवी ३२४,३९२,५0४,५0६अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला एक दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात इतर आरोपींना सुध्दा लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी अनेक संघटनांनी प्रशासनाला केली आहे. तसेच लेखी निवेदन पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे करीत आहेत.





