27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता हेडगेवार चौकात युवकाची भरदिवसा हत्या

हेडगेवार चौकात युवकाची भरदिवसा हत्या

0
1636
  • भंडारा,दि.१९- भंडारा पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या शहरातील हेडगेवार चौक ते साईप्रसाद हाॅटेलच्या दरम्यान आज शुक्रवारला दुपारच्या सुमारास एका युवकाची हत्या झाल्याची घटना घडली.या घटनेत मृत पावलेल्या युवकाचे नाव सरफरोज असे असून तो मेंढा येथील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान घटनेची वार्ता शहरात पसरताच पोलीस प्रशासनानेही तत्काळ घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतले.पोलीस निरिक्षक लोकेश कणसे यांनी गुन्हेगारांच्या तपासात पथकाला कामाला लावून काही तासातच आरोपीला जेरबंद केले आहे.या घटनेने भंडारा शहरात मात्र दहशत निर्माण झाली आहे.