27.2 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home राजकीय शासनाने राज्यातील वीज घोटाळयाची चौकशी करावी – माजी आमदार चरण वाघमारे

शासनाने राज्यातील वीज घोटाळयाची चौकशी करावी – माजी आमदार चरण वाघमारे

0
1074

भंडारा,दि.१९- कोव्हीड -१९ मुळे उद्भवलेली लॉक डाऊन परिस्थिती आणि त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेली लॉकडाऊन प्रक्रिया यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या, कम्युनिटी प्रसार रोखण्यात आलेले यश, जरी सत्य असले तरी लॉकडाऊनच्या काळात याचा गैरफायदा घेणारे पण कमी नसल्याचे, महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा विभागाने दाखवून दिले यात, खूप मोठा घोटाळा झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकडे लक्ष देण्याची, चौकशी करण्याची आवश्यकता असल्याची भूमिका माजी आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.

कम्युनिटी प्रसार थांबविण्यासाठी, वीज मीटर रिडींग घेणे, वीज बिल तयार करणे यांसारखी कामे प्रत्यक्षात थांबवून ऑनलाइन तंत्राद्वारे तयार झालेले वीज बिलाचा भरणा करणे, अशी कामे वीज ग्राहकांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे करावी, त्यांनाच विज बिल मोबाईल वर मेसेज द्वारे ऑनलाइन भरता येईल. ही सुविधा महावितरण कंपनीद्वारे महाराष्ट्र राज्यात करून देण्यात आली.

ज्या वीजग्राहकांना मीटर रीडिंग स्वतः घेऊन विद्युत कंपनीला सादर करावे, असे मेसेज गेले नाही किंवा नेटवर्क नसणे, वीज ग्राहक उपलब्ध नसेल ग्रामीण भागातील लोकांना याची पुरेपूर माहिती नसणे, माहिती प्रात्यक्षिके महावितरण कंपनीने न देणे, व इतर कारणाने राज्यातील तमाम वीज ग्राहकांना तीन महिन्याचे एकूण वीज वापराचे बिल एकाच वेळी देण्यात आले. वीज वितरण कंपनीने याच कायद्याचा गैरफायदा घेऊन घोटाळा केला असून बेपरवा असलेल्या ग्राहकांची आर्थिक लूट करण्याचा हा प्रकार सहन केला जाणार नाही.

शासनाने याची चौकशी करावी, आणि गेल्या तीन महिन्यापासून कोणालाच इलेक्टिड्ढक बिल आलेले नाही. आता अचानक तीन महिन्याचे एकत्रित विज बिल ग्राहकांना मिळणार आहेत. हे वीज बिल भरणे सामान्य नागरिकांना अशक्य असल्याने राज्य सरकारने ३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे आणि उरलेल्या वापर युनिटचे शंभर युनिटच्या मर्यादेमध्ये बील जनरेट करून हप्ते पाडून द्यावे. जेणेकरून सामान्य नागरिकांना न्याय मिळेल. अन्यथा जनतेसाठी जन आंदोलन करून रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी आमदार तथा विकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चरण वाघमारे यांनी शासनाला पाठवलेल्या निवेदनातून केला.