25 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता मालगाडीच्या धडकेत 13 रानडुकरांचा मूलनजीक मृत्यू

मालगाडीच्या धडकेत 13 रानडुकरांचा मूलनजीक मृत्यू

0
2353

चंद्रपूर,दि.19 :चंद्रपूर-गोंदिया रेल्वेमार्गावरील मुल तालुक्यातील घनदाट जंगलातून रेल्वेमार्ग जात असल्याने या मार्गावर अनेकदा जंगली श्वापदांचा मृत्यू रेल्वेगाडीमुळे होत असल्याचा घटना घडत असतात.त्यातच आज 19 जून रोजी सकाळच्या सुमारास मुल शहरानजीक बल्लारपूरकडून गोंदियाकडे जात असताना 13 रानडुकरांचा मालगाडीच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेत पंचनामा केला. सध्या प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे या मार्गावरून मालवाहतूक करणाऱ्या गाड्यां अधिक संख्येने जात आहेत. आज सकाळी बल्लारपूर मार्गे गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडीच्या पुढे अचानक रानडुकरे आल्याने ही घटना घडली.