25 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home गुन्हेवार्ता 35 हजाराची लाच घेतांना एपीआय अतुलकरसह पोलीस उपनिरक्षक जाळ्यात

35 हजाराची लाच घेतांना एपीआय अतुलकरसह पोलीस उपनिरक्षक जाळ्यात

0
4090

गोंदिया,दि.19ः-गोंदिया पोलीस मुख्यालयांशेजारी असलेल्या गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रदीप अतुलकार यांनी पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ यांच्यामार्फत  35 हजार रुपयाची लाच घेतांना आज 19 जून रोजी पकडण्यात आले.याप्रकरणाची कारवाई सध्या गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे येथे करण्यात आली.तक्रारदारास चाईल्ड एक्ट कायद्यात गुन्हा दाखल न करता ना हरकत देण्य़ासाटी पैसाची मागणी करण्यात आली होती.तक्रारदार हे पोलीस विभागातीलच कर्मचारी असून मुलाविरुध्द कारवाई होऊ नये यासाटी विनंती केली होती.ही कारवाई गोंदिया लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक ऱमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.