
गोंदिया / भंडा,दि.२०:::राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यायांसाठी 500/- रुपये बोनस जाहिर केला होता परंतु गेल्या हिवाळी अधिवेशानात खासदार प्रफुभाई पटेल यांच्या निवेदनावर राज्य शासनाने 200/- रुपये बोनस वाढवण्याची घोषणा केली अश्या प्रकारे धान उत्पादक शेतकरऱ्यासाठी 700/- रुपये प्रति क्विंटल बोनस जाहिर झाला. शासनाने जाहिर केलेल्या बोनस ;खरीप हंगाम 2019-20 साठी या पूर्वी मिळालेली निधी शेतकऱ्याच्या खात्यात वळती करण्यात आलेला आहे. त्यानंतर सुध्दा गोंदिया व भंडारा जिल्हयातील शेतकऱ्याची बोनसची निधी शासना कडे प्रलंबित आहे. खासदार प्रफुल पटेल यांनी पुन्हा राज्य शासनास पत्र व्यवहार केला व राज्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचेशी शीतकऱ्याचे प्रलंबित बोनस तातडीने देण्या संबंधी चर्चा केली. त्या अनुशंगाने महाराष्ट्रराज्य मार्केटिग फेडरेशन, मुंबई कडून दिनांक 17.6.2020 रोजी गोंदिया जिल्हयातील शीतकऱ्याना बोनस देण्यासाठी गोंदिया जिला मार्केटिग अधिकारी गोंदिया कडे 56.34 कोटी व भंडारा जिला मार्केटिंग अधिकारी कडे 103.65 कोटी ची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. आता ज्या धान उत्पादक शेतकऱ्याना बोनस ची रक्कम मिळालेली नाही त्यांना लवकरच बोनसची रक्कम मिळणार. तसेच रबी हंगाम 2020-21 मधे खरेदी केलेल्या धानाचे चुकारे करण्या गोंदिया जिला मार्केटिंग अधिकारी यांच्या कडे 134.76 कोटी व भंडारा जिला मार्केटिंग अधिकारी यांच्या कडे 42.89 कोटी ची रक्कम वर्ग 18.6.2020 रोजी करण्यात आलेली आहे. बोनस ची निधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल जिल्हयातील धान उत्पादक शेतकऱ्यानी खा. पटेल यांचे आभार मानले आहे.





