गोंदिया,दि.21 : गोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित न.मा.द महाविद्यालयतील राष्ट्रीय सेवा योजनाद्वारा रासेयो स्वंयसेवकांनी परिवारातील सदस्यांसोबत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा केला.
शिक्षण संस्थेचे खा. प्रफुल पटेल, अध्यक्ष वर्षा पटेल, संचालक निखिल राजेंद्र जैन, रातुम नागपुर विद्यापीठ रासेयो विभागाचे संचालक डॉ. केशव वालके, प्राचार्या डॉ. रजनी चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनात रासेयो माजी जिल्हासमन्वयक प्रा. बबन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली 128 रासेयो स्वंयसेवकानी आपल्याला परिवारातील सदस्यांसोबत घरीच विवीध योगासने करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. तर ऑनलाईन सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्राचार्या डॉ. रजनी चतुर्वेदी व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन मेश्राम यांनी योगाभ्यास विषयी मार्गदर्शन केले. सदर उपक्रमात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रवीकुमार रहांगडाले, प्रा. रितू तुरकर, जागृत सेलोकर, आकाश नागपुरे, समीर गडपायले, चाहत मेश्राम, दीपाली फुंडे, देवेश्री मेश्राम, निधी कटरे, हर्षद कुमार, यश मेश्राम, आदित्य वैद्य यांसह रासेयो स्वंयसेवक, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
रासेयोंनी कुटुंबांसोबत केला योगदिन साजरा
न.मा.द महाविद्यालयचा स्तुत्य उपक्रम





