37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home रोजगार/व्यापार सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेशास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेशास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

0
925

मुंबई, दि. 24 – मुंबईतील वर्सोवा येथील शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देण्यात येणाऱ्या सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.

मत्स्यव्यवसाय व सागरी मासेमारीचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीसाठी शासकीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याअनुषंगाने २०१९ – २० या चालू वर्षातील प्रशिक्षण वर्ग दिनांक ०१ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत होणार आहे.  या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज मागविण्याची मुदत वाढविण्यात येत असून दिनांक ३०/०६/२०२० पर्यंत पात्र व इच्छुक प्रशिक्षणार्थींनी पुढील पत्यावर अर्ज पाठवावेत अर्ज पाठविण्याचा पत्ता- शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग,तेरे गल्ली,वर्सोवा मुंबई –  ६१ या पत्त्यावर अथवा [email protected]   या ईमेल वर  ३० जून २०२० पर्यंत सादर करावेत.

blank