
भंडारा दि.२५ः:जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आंधळंगाव येथील कार्यालयाच्या छतावर चढून दुरुस्ती करणारा पिपंळगाव निवासी फळरोप वाटिका मजूर गणेश सोविंदा गभणे काली पडून ठार झाल्याप्रकरणी सबंधित अधिकार्यावर कारवाई करुन मृत मजुराच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी शिवसेनेने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करीत केली आहे. गणेश गभणे हे कामावर हजर असतांना तेथील अधिकार्यानी मजूर गभणेना कार्यालयाचे छतावर चढवून छताची दुरुस्ती करण्यास सांगितले.मजुराने अधिकार्याच्या सांगण्यावरून दुरुस्तीचे काम करीत असतांना त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा दिली नसल्याने मजूर खाली पडला त्यामुळे त्यांचा २ जून रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली.
सदर अधिकारी हे बेकायदेशीर फळरोप वाटिकामधील मजुरांमधूनच एका मजुराला बोगस मजूर ठेकेदार दाखवून त्याला मजूर कंत्राटदार दाखवत आहेत.जेव्हा की तो मजूर कंत्राटदार नसून मजुरांमधीलच एक मजूर आहे.असे करून ते शासनाची दिशाभूल करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवि वाढई, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पंचबुद्धे, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे अमित एच. मेश्राम, शिवसेना उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, जिल्हा एस. टी. कामगार सेनेचे विभागीय सचिव देवा मिरासे, तालुका प्रमुख अनिल सार्वे, बलदेव लूटे सह पदाधिकारी उपस्थित होते.





