30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीत ओबीसीवर अन्याय

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीत ओबीसीवर अन्याय

0
145

चंद्रपूर,दि.25ः-राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य विभागाने काढलेल्या ४८ पदाच्या कंत्राटी मनुष्यबळ जाहिराती मध्ये ओबीसीसाठी एकही जागा राखीव ठेवण्यात आली नाही.बिंदू नामावलीचा शासन आदेश रद्द केल्यानंतरही ओबीसी बेरोजगारांना डालवून नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने ओबीसी बेरोजगरमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेत निवेदन देत अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूरने ४८ पदासाठी जाहिरात प्रसिध्द केली. यामध्ये ओबीसी उमेदवारांना एकही जागा कोणत्याही पदासाठी राखीव ठेवण्यात आली नाही. उलट मराठा व ईडब्यूएस साठी जागा राखीव आहेत. मात्र, जिल्हात मोठया प्रमाणात ओबीसी समाज असतांना आणि वर्ग अ व वर्ग ब या पदासाठी ओबीसींना 19 टक्के आरक्षण असतांना ओबीसी बेरोजगरावर अन्याय झाला आहे. सामान्य प्रशासनाच्या परिपत्रक नुसार दिनांक १६ आगस्ट २०१९ व २१ आगस्ट २०१९ चे बिंदूनावलीचे दोन्ही परिपत्रक, शासनाने हे बिंदूनावलिचे प्रतिपत्रक २२ आगस्ट २०१९ परिपत्रक कडून रद्द केले आहेत. त्यानंतर कोणतेही सुधारित बिंदूनावलीचे परिपत्रक निघाले नसताना कोणत्या आधारावर आरोग्य विभागाने काढलेल्या आरक्षण ठरविण्यात आले आहे व निवड यादी दिनांक 20 जून 2020 ला जाहीर केली आहे हे कळायला मार्ग नाही. कोरोना संकटाच्या काळात आरोग्य विभागाने जागा भरल्या पाहिजेत यात दुमत नाही परंतु ओबीसी बेरोजगावर होत असलेला अन्याय दूर झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस सचिन राजुरकर यांनी निवेदेना व्दारे इतर मागास बहुजन कल्याण HB मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.