गोंदिया,दि.२५ः-तलाठी संघटनेने लॉकडाऊनमध्ये फसलेल्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य करुन त्यांना त्यांच्या गावी जाण्याकरीता टाटा सुमो वाहन उपलब्ध करुन देत सामाजिक जाणिवतेचा परिचय करुन दिला आहे.सविस्तर असे की,गेल्या तीन महिन्यापासून अजय खाकोडिया हे आपल्या ५ सहकारीसोबत लॉकडाऊनमुळे गोंदियातच अडकले.त्यातच त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने ते वाहन करुन आपल्या मुळ गावी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे जाऊ शकत नव्हते.त्यांना गावी जायचे असल्याची इच्छा रियाज तुर्क यांच्याकडे बोलून दाखवले असता त्यांनी तलाठी संघटना गोंदिया उपविभागाचे अध्यक्ष सुनिल राठोड यांना सांगितले.राठोड यांनी सदर माहिती नायब तहसिलदार सचिन पाटील यांना सांगितली असता त्यांनीही मदत करण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर टाटा सुमो वाहन भाड्याने घेत त्या वाहनाची ईपास तयार करुन खोकडियासह त्या ५ जणांना त्यांच्या मुळ गावी रवाना करण्याच्या कार्यात नायबतहसिलदार गणपत qशगाडे यांनीही सहकार्य केले.या सामाजिक कार्यात सर्व तलाठी,मंडळ अधिकारी यांनी आर्थिक सहकार्य करीत आपल्या कत्र्यव्यासोबतच सामाजिक आदर्श समोर ठेवला आहे.





